InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागची फलंदाजी आता भाजपच्या मैदानावर?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या तिकीटावर विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. भाजपा हरियाणातील रोहतक मतदारसंघातून सेहवागला उमेदवारी देऊ शकते.

भाजपाच्या  एका वरिष्ठ नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ‘सेहवागसंबंधी पक्षाने निर्णय घेतला आहे. आता यासाठी होकार द्यायचा की नाही हे संपूर्ण सेहवागवर अवलंबून आहे. ज्या नेत्याकडे विरेंद्र सेहवागशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तो नेता दिल्ली आणि एनसीआरमधील राजकारणात सक्रिय आहे’.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.