InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी

- Advertisement -

भारताने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर पुनर्रचनेचे विधेयक संसदेत मंजूर केले. भारत सरकारने उचललेल्या या पावलामुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंधही तोडले आहेत. यासोबतच आता पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपटांवरही बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहाय्यक डॉ. फिरदौस आशिक अवाणा यांनी पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना हे जाहीर केले. फिरदौस म्हणाल्या, भारतीय सांस्कृतिक आशय असलेल्या सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे धोरण सरकार सध्या तयार करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.