InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘धोनी देना साथ हमारा’; भारतीय चाहत्यांचे सोशल मीडियावर मीम्स

ICC Cricket World Cupच्या सेमीफायनलचा पहिला दिवस पावसामुळं रद्द झाला. दरम्यान आज न्यूझीलंडचा 46.1 षटकांपुढचा खेळ खेळण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमारने न्यूझीलंडला तीन धक्के देत केवळ 28 धावा दिल्या. 50ओव्हरनंतर न्यूझीलंडला 239 धावा करता आल्या. या आव्हानांचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी अवघ्या 4 धावांत तंबूत परतली. त्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी 46 धावांची भागिदारी केली. मात्र ऋषभ पंत आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर असाच काहिशी बेजाबदार फलंदाजी हार्दिक पांड्यानं केला. पांड्या 32 धावांवर बाद झाला.

त्यामुळं आता भारताची भिस्त धोनी आणि जडेजा या दोन खेळाडूंवर असणार आहे. धोनीच्या खेळीवर भारताचा विजय अवलंबून आहे.त्यामुळं सध्या सोशल मिडियावर धोनी म्हणजे धोनीबली असे मीम्स व्हायरल होत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply