‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितले बॉलीवूडमधून हरवून जायचे धक्कादायक कारण

मुंबई : ‘इंडियन आयडल’मध्ये विजेतेपद पटकवणाऱ्या मराठमोळ्या अभिजीत सावंतला लोकप्रियता, पैसा सगळे मिळाले. आत्ता पुढे जाऊन बॉलीवूडमध्ये तो गाण्यांची रांग लावणार असे वाटत होते, पण असे काही झाले नाही. इतका छान गात असतानाही त्याला गाण्यांचे काम का भेटले नाही? आणि तो कोठे तरी हरवून गेला. यावर स्वतः अभिजीतनेच असे नेमके का झाले हे सांगत धक्कादायक उत्तर दिले.

“आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. त्यांचा एक गट असतो त्या गटामध्ये पोहोचणं बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असतं. माझ्या बाबतीतही तेच घडलं. इंडियन आयडल जिंकल्यावर माझा प्रवास सुरु झाला. गेल्या 15 वर्षांच्या काळात अनेकांनी मला रिजेक्ट केलं कारण मी त्यांच्या गटातील गायक नव्हतो. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात. त्यामुळं त्यांना म्हणावी तशी संधी नाही”. असे अभिजीतनं बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटांमध्ये गाण्याची संधी न मिळण्यामागचं कारण सांगितलं.

इंडियन आयडल जिंकल्यानंतर सोनी वाहिनीनं अभिजीतचा गाण्यांचा अल्बम लॉन्च केला होता. मात्र त्यानंतर त्याला कुठल्याच चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं त्यानं चित्रपटांचा नाद सोडून आता लाईव्ह शोवर जास्त लक्ष दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा