Indian Post Recruitment | भारतीय डाक विभागात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना दुसरीकडे भारतीय डाक विभागात (Indian Post) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासंबंधीची माहिती भारतीय डाक विभागाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 98 हजाराहून अधिक रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. पदानुसार पात्रधारक उमेदवारांनी या पदाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत व पोर्टलला भेट द्यावी.
भारतीय डाक विभागामध्ये (Indian Post) विविध पदांच्या 98 हजर राहून अधिक जागा
भारतीय डाक विभागामध्ये तब्बल 48 हजाराहून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाचे अधिकृत पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये पोस्टमन, मेल गार्ड मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
वयोमर्यादा
भारतीय डाक विभागामध्ये 48 हजाराहून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय डाक विभागाचे अधिकृत पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार या पदांसाठी 18 ते 32 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
भारतीय डाक विभागाच्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अद्याप भारतीय डाक विभागाकडून या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखे बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
भारतीय डाक विभागाच्या (Indian Post) या पदांसाठी अर्ज कसा करावा
भारतीय डाक विभागाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील प्रमाणे अर्ज करावा.
- इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम इंडिया पोस्ट पोर्टल indiapost. gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर मुख्य पेज उघडल्यावर ‘इंडियन पोस्ट रिक्रुटमेंट 2022’ या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिलेली माहिती आणि आवश्यक तपशील संपूर्ण भरावे लागतील.
- माहिती भरल्यानंतर उमेदवाराला आवश्यक ती कागदपत्रे आणि नोंदणी फॉर्म अपलोड करावा लागेल.
- यामध्ये नाव, फोन नंबर, लिंग, श्रेणी आणि जन्मतारीख इत्यादी गोष्टी प्रविष्ट करणे उमेदवाराला अनिवार्य आहे.
- माहिती प्रविष्ट केल्यानंतर माहितीची पडताळणी करण्यासाठी दिलेल्या फोन नंबर वर OTP येईल.
- OTP सबमिट केल्यानंतर उमेदवाराला कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्जाची फी ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरावी लागेल.
- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या नोंदणी फॉर्म यशस्वीरित्या केला जाईल.
- त्यानंतर तुम्हाला भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- Deepak Kesarkar | “आधी तुमच्या घरात लागलेली आग विझवा” ; दीपक केसरकरांचा अजित पवारांवर पलटवार
- Amol Mitkari | एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या ‘त्या’ भेटीवरून अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…
- Elon Musk | ट्वीटरचा ताबा घेताच एलन मस्कने कंपनीतून काढले निम्मे कर्मचारी
- Nitin Gadkari | “कारण नसताना लोक…”, प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने होणाऱ्या टीकांवर नितीन गडकरी कडाडले
- Deepak Kesarkar | “बाळासाहेबांची खिल्ली उडवणाऱ्या…” ; दीपक केसरकरांचा सुषमा अंधारेंवर जोरदार पलटवार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.