Indian Railway | भारतीय रेल्वेच्या ‘या’ चुकीमुळे शेतकरी बनला ट्रेनचा मालक; वाचा सविस्तर

Indian Railway | नवी दिल्ली : नुकतीच एक वेगळी माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) एका चुकीमुळे पूर्ण ट्रेन एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ( Farmer) नावावर झाली आहे. तर शेतकरी आता त्या रेल्वेचा मालक झाला असल्याचं पाहायला मिळतं आहे. ही ट्रेन अमृतसर ते नवी दिल्ली धावत असून या ट्रेनच स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस (Swarn Shatabdi Express) असं नाव आहे. नक्की असं काय झालं की, ट्रेनचा मालकी हक्क शेतकऱ्यांच्या नावावर झाला.

नक्की काय आहे प्रकरण ?

याप्रकरणी माहिती घेतली असता अशी माहिती समोर आली आहे की, या प्रकरणाला सुरुवात
२००७ लाच झाली होती. कटना गावातील शेतकरी ‘संपूर्ण सिंग’ (Sampuran Singh) यांची जमीन लुधियाना चंदीगड रेल्वे ट्रक बांधकामाच्यावेळी रेल्वेने घेतली होती. त्यावेळी त्या जमिनीचा हवा तसा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांने न्यायालयात धाव घेतली त्या दरम्यान न्यायालयाने संपूर्ण माहिती निकाल दिला. त्या निकालमध्ये न्यायालयाने सांगितले होते की, शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून १.०५ कोटी देण्यात यावे परंतु रेल्वेने ही भरपाई काही दिली नाही. यामुळे हे प्रकरण त्यावेळी काही मिटल नाही.

Sampuran Singh Is the Owner of Swarn Shatabdi Express

दरम्यान, न्यायालयाने रेल्वेला दिलेल्या आदेशाचे पालन रेल्वेने केले नाही. हळू- हळू नुकसान भरपाईची रक्कम वाढत जाऊन १.४७ कोटी रूपये झाली. पुन्हा शेतकऱ्यांने २०१२मध्ये याचिका केली. त्यानंतर न्यायालयाने २०१५ मध्ये पुन्हा रेल्वेला नुकसान भरपाईचे आदेश दिले. परंतु, रेल्वेने पालन न केल्यामुळे लुधियाना स्टेशनवरील ट्रेन क्रमांक १२०३० आणि स्टेशन मास्टरचं कार्यालय देखील जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिला. यामुळे ‘संपूर्ण सिंगच्या’ (Sampuran Singh) नावावर स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस (Swarn Shatabdi Express) ही ट्रेन झाली असून आजही ती शेतकऱ्याच्या मालकीची आहे. तसचं मीडिया रिपोर्टनुसार अजूनही या प्रकरणी न्यायालयात सूनवण्या सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3MxiKUS