“15 लाखांसाठी भारतीय गेल्या सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा”

मुंबई : ‘यास’ चक्रीवाळच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिरा पोहचल्या आणि पंतप्रधानांना लिखित अहवाल देऊन लगेच निघून गेल्या. यावरून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या. भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट बघा!

‘’चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणे हे उद्धटपणाचे आणि अविचारी असून मुख्यमंत्र्यांची वर्तणूक शिष्टाचार आणि संघराज्यवादावर आघात आहे,” असे केंद्र सरकारने ममतांनी केलेल्या विलंबावरून म्हटले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही यासाठी ममतांवर टीका केली होती.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारात मोदी म्हणाले होते की, परदेशात असलेला काळा पैसे परत आणला तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळू शकतील. याचा शब्दशः अर्थ घेऊन महुआ मोईत्रा यांनी ट्विट केले “३० उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा!”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा