InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

ट्रायच्या या निर्णयाने भारतातून ‘आयफोन’ हद्दपार ?

- Advertisement -

टीम महाराष्ट्र देशा : जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपल आणि ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) यांच्यात डीएनडी अॅपवरुन सध्या वाद सुरु आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅपलने डीएनडी अॅप इन्स्टॉल करावं अशी ट्रायने मागणी केली आहे. मात्र अॅपल युजर्सच्या गोपनियतेसाठी अॅपलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही तर, कंपनीला भारतीय बाजारपेठेपासून दूर रहावं लागेल, असं ट्रायने घोषित केल आहे. त्यामुळे ट्राय आणि अॅपलच्या भांडणात अॅपलचे फोन हद्दपार होतील का?

ट्रायने १९ जुलैपासून नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अॅप इन्स्टॉल असावं ज्यामुळे फ़ेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल. ट्रायने नियमाचं पालन करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्याची मुदत देखील दिली आहे.

- Advertisement -

ट्रायने २०१७ मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप सध्या अॅन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र अॅपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅपला जागा दिली नाही. त्यामुळे या निर्णयाने भारतातून ‘आयफोन’ हद्दपार होऊ शकतो?

अॅपलने कधीही थर्ड पार्टी अॅप्सना आपल्या युजरचे कॉल आणि मेसेज वाचण्याची परवानगी दिलेली नाही. अॅपलचं म्हणणं आहे की, डीएनडी अॅप युजर्सचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो. त्यामुळे युजरची गोपनियता धोक्यात येऊ शकते. आता डीएनडी अॅॅपच्या या भांडणात कोण नमतं घेईल, हे पाहावं लागेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.