भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसऱा कसोटी सामना भारताने एक डाव आणि 137 धावांनी जिंकून मालिकासुद्धा 2-0 ने खिशात घातली. भारताने पहिल्या डावात 601 धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला 275 धावांवर बाद करत फॉलोऑन दिला. दुसरा डाव 189 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून दुसऱ्या डावात जडेजा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर अश्विनने दोन आणि शमी, इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी भारताकडून गोलंदाजीत पहिल्या डावात अश्विननं सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या. विराट आणि मयंकनं तुफानी फलंदाजी केल्यानंतर आफ्रिकेचे फलंदाज अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. तरी, गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशव महाराजनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केशवच्या 72 धावांच्या खेळीमुळं आफ्रिकेनं 275 धावांपर्यंत मजल मारली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी भारतानं चांगली गोलंदाजी करत 275 धावांवर बाद केले.

दरम्यान, दुसऱ्य़ा दिवशी 36 धावांवर तीन विकेट गमावलेल्या आफ्रिकेला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र कर्णधार फाफ ड्युप्लेसिसनं आफ्रिकेचा डाव सावरण्याच प्रयत्न केला. ड्यु प्लेसिस णि क्विंटन डी कॉक यांच्या अर्धशतकी भागिदारीनं आफ्रिकेला सावरले. त्यानंतर डी कॉकला 31 धावांवर अश्विननं माघारी धाडले. अष्टपैलु मुथुस्वामीलाही चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजानं त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार ड्युप्लेसिसला अश्विननं माघारी धाडले.

Loading...

केशव महाराज आणि फिलेंडर यांनी चांगली खेळी करत डाव सांभळला. अखेर केशवला अश्विननं 72 धावांवर बाद केले. तिसऱ्या दिवशी भारताकडून अश्विननं 4, उमेश यादव 3, शमीनं 2 तर जडेजानं एक विकेट घेतली.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.