InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

वर्ल्डकपमध्येही प्लेऑफ सामना हवा: विराट कोहली

- Advertisement -

भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण उपांत्य फेरीच्या सामन्याच्या दिवशी केलेल्या खराब खेळामुळे भारताचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं.

गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवूनही उपांत्य फेरीतील पराभवामुळे भारतीय संघाला गाशा गुंडाळावा लागला. याच पार्श्वभूमीवर वर्ल्डकप स्पर्धेत आयपीएलप्रमाणे प्लेऑफ सामना आयसीसीने घ्यावा, असा सल्ला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिला आहे.

Loading...

- Advertisement -

न्यूझीलंडच्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४५ मिनिटांच्या खराब खेळामुळे सामना गमावल्याचं कोहलीने मान्य केलं. आगामी काळात वर्ल्डकपमध्येही प्लेऑफचा सामना खेळविण्यात यावा का? याबाबत कोहलीला विचारणा करण्यात आली. ‘भविष्यात कदाचित हा निर्णय घेतला जाऊ शकतो. स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करणं जर गरजेचं असेल तर स्पर्धेचं महत्त्व लक्षात घेऊन प्लेऑफ पद्धतीबाबतही विचार करता येऊ शकतो’, असं कोहली म्हणाला.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.