Indigestion | अपचनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Indigestion | टीम महाराष्ट्र देशा: मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अपचनाची समस्या निर्माण होते. यामध्ये पोट दुखी, पोट फुगणे, जळजळ होणे, उलट्या होणे इत्यादी लक्षणे दिसायला लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. हे उपाय केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. अपचनाच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

लिंबू आणि आल्याचे पाणी (Lemon and ginger water-For Indigestion)

लिंबू आणि आल्याचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा किसलेले आले आणि आवश्यकतेनुसार लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी उकळून घ्यावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात. या पाण्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या सहज दूर होऊ शकते.

बेकिंग सोडा (Baking soda-For Indigestion)

अपचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये दीड चमचा बेकिंग सोडा मिसळून घ्यावा लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या सहज दूर होते. त्याचबरोबर बेकिंग सोद्याच्या मदतीने ऍसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.

बडीशेप (Fennel-For Indigestion)

बडीशेपच्या मदतीने अपचनाच्या समस्या सहज दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये आवश्यकतेनुसार बडीशेप उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी कोमट झाल्यावर गाळून प्यावे लागेल. हे पाणी प्यायल्याने उलटी सोबतच अपचनाच्या समस्या दूर होतात.

अपचनाच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकतात. त्याचबरोबर लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या खालील समस्या दूर होऊ शकतात.

एक्ने दूर होतात (Acne goes away-Clove Water Benefits)

चेहऱ्यावरील एक्नेची समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये आढळणारे अँटिस्पेक्टिक आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म चेहरा स्वच्छ करतात आणि चेहऱ्याला संसर्गपासून दूर ठेवतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहरा चमकदार बनवण्यासाठी लवंगाचे पाणी फायदेशीर ठरू शकते.

चेहऱ्याची चमक वाढते (The glow of the face increases-Clove Water Benefits)

नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लवंगाच्या पाण्याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. लवंगाच्या पाण्यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेचा रंग साफ करण्यास मदत करतात. नियमित लवंगाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या