Indonesia Earthquake | इंडोनेशिया भूकंपाने हादरला , 44 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक लोक जखमी

जकार्ता : इंडोनेशिया (Indonesia) ची राजधानी जकार्ता (Jakarta) येथे भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. इंडोनेशियातील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावामधील सियांजूर येथे जमिनीच्या दहा किमी खोलीवर होता. यामुळेच त्सुनामीचा कोणताही धोका निर्माण झाला नाही असे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या भूकंपामध्ये आतापर्यंत तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी संध्याकाळपासूनच भूकंपाचे जोरदार धक्के जाणवायला लागले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी (भारतीय वेळ) हा भूकंप झाला आहे. तरी या भूकंपाची खोली भूगर्भात 20 किमी होती.

दरम्यान, भारतामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचा धक्का जाणवत आहे. भारतातील हिमाचल प्रदेशातील कुलू आणि मांडी या ठिकाणी बुधवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवायला लागले होते. या भूकंपाची तीव्रता 4.1 मोजली गेली होती. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये देखील सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळच्या 9 वाजून 55 मिनिटाच्या सुमारास हे धक्के जाणवले होते. त्याचबरोबर या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 होती.

भारताप्रमाणे जपानमध्ये देखील सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवताच तेथील लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदवण्यात आलेली आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की घरातल्या वस्तूही खाली पडल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.