InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपमधील 7 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती

कर्नाटकात काठावर बहुमत असलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारवर गेल्या काही दिवसांपासून टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत होतं. पण आता काँग्रेसच्या एका खेळीनं भाजपला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपमधील तब्बल 7 आमदार काँग्रेस-जेडीएसच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपने काँग्रेसला धक्का देत काही आमदार आपल्याकडे खेचले. पण आता रिव्हर्स मिशनमुळे भाजपच अडचणीत आली आहे. काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असणारे डीके शिवकुमार सरकार कर्नाटकातील सरकार टिकवणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भाजपमधील 7 आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. भाजपचे सर्व 105 आमदार सध्या रिसॉर्टमध्ये आहेत. पण विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपचे काही आमदार काँग्रेस-जेडीएस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आमदारांना मंत्रिपदासह तगड्या ऑफर्स देण्याची काँग्रेसची तयारी असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply