InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मंदिरात ८ वर्षीय मुलाबरोबर घडले अमानुष कृत्य

- Advertisement -

मंदिरात चोरीच्या संशयावरुन एका आठ वर्षीय मुलाला गरम टाईल्सवर बसवल्याने त्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी इथे ही घटना घडली. हे अमानुष कृत्य करणाऱ्या उमेश उर्फ अमोल ढोरेला पोलिसांनी काही तासात अटक केली.

आर्वीमधल्या जोगनामाता मंदिर परिसरात चिमुकला खेळत होता. त्यावेळी उमेश उर्फ अमोल ढोरेने मुलाचे कपडे काढून मारहाण केली आणि मंदिर परिसरातीलच टाईल्सवर बसवलं. टाईल्स गरम असल्याने काही वेळातच चिमुकल्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली.

Loading...

- Advertisement -

 चिमुकल्यासह त्याच्या कुटुंबियांची विविध सामाजिक संघटनांनी भेट घेत मदतीची तयारी दर्शवली आहे. चिमुकल्यावर आर्वीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंदिरातील दानपेटी कुलूपबंद आहे आहे. त्यामुळे गुन्हेगाराने केलेल्या आरोपांतील सत्यतेबाबत संशय व्यक्त होत आहे.

Loading...
 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.