ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; साहित्य संमेलनादरम्यान संभाजी ब्रिगेडचे कृत्य

नाशिक : सध्या नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन भरवलं गेलं आहे. मात्र आता हे साहित्य संमेलन काही वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरतंय. दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे.

गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी सांगितले. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गिरीश कुबेर हे सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याने हा हल्ला केल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा