गिरीश कुबेरांवर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; प्रवीण दरेकरांकडून या घटनेचं समर्थन

नाशिक : सध्या नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन भरवलं गेलं आहे. मात्र आता हे साहित्य संमेलन काही वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरतंय. दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये शाईफेक करण्यात आली. नाशिकमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनस्थळी हा प्रकार घडला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या घटनेला आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी समर्थन दर्शवला आहे. ही संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिलं असेल, असं दरेकर म्हणाले.

दरम्यान, या घटनेचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध नोंदवला आहे. साहित्य संमेलनात अशाप्रकारचे कृत्य करणे चुकीचे आहे. पुराव्यासह चुका दाखवायला हव्यात. शिवाय समोरासमोर चर्चा करायला हवी, अशाप्रकारे शाईफेक करणे चुकीचे आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा