Instagram Story | एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्याची इंस्टाग्राम स्टोरी बघायची असेल, तर ‘या’ टिप्स करा फॉलो

Instagram Story | टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामध्ये प्रामुख्याने व्हाट्सअप (Whatapp), इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) या सोशल मीडिया ॲप्लीकेशनचा समावेश आहे. यामधील इंस्टाग्रामवर सध्या एक अब्जाहून अधिक वापरकर्ते सक्रिय आहेत. इंस्टाग्रामवर लोक त्यांचे व्हिडिओ, फोटो, रील इत्यादी गोष्टी शेअर करू शकतात. अनेक लोक इंस्टाग्रामवर आपला दिनक्रम स्टोरी (Story) च्या माध्यमातून शेअर करतात. यामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची स्टोरी पाहता, तेव्हा त्या व्यक्तीला ते कळून येते. अशा परिस्थितीत अनेकदा तुम्हाला त्या व्यक्तीच्या नकळत त्याची स्टोरी बघायची असते. तुम्हाला पण जर एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्याची स्टोरी बघायची असेल, तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

इंस्टाग्रामवर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्याची स्टोरी बघायची असेल, तर त्यासाठी तुम्ही ‘एरोप्लेन मोड’चा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम इंस्टाग्राम ओपन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्व स्टोरी लोड करून घ्याव्या लागतील. सर्व स्टोरी व्यवस्थित लोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सुमारे पाच सेकंदानंतर पुन्हा इंस्टाग्राम ओपन करावे लागेल. पुन्हा इंस्टाग्राम उघडल्यावर तुम्हाला ज्या व्यक्तीची स्टोरी बघायची आहे त्यावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीची स्टोरी ओपन होईल. या टिप्स फॉलो करून स्टोरी पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हीवर यादीमध्ये तुमचे नाव नसेल.

तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्याची स्टोरी बघायची असेल, तर तुम्ही एक अतिरिक्त इंस्टाग्राम अकाउंट उघडू शकतात. कारण इंस्टाग्राम तुम्हाला एकापेक्षा अधिक अकाउंट उघडण्याची परवानगी देते. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त अकाउंट ओपन करून एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्याची स्टोरी पाहू शकतात.

याशिवाय अनेक थर्ड पार्टी आणि वेबसाईट उपलब्ध आहे, ज्याच्या उपयोगाने तुम्ही व्यक्तीच्या नकळत त्याची स्टोरी बघू शकतात. पण याचा वापर केल्याने तुमच्या प्रायव्हसीमध्ये बाधा येऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी नेहमी थर्ड पार्टी आणि वेबसाईटपासून दूर राहिले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या