“नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला”

मुंबई : पावसाने मुंबईत आज जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकार तसेच मुंबई मनपावर जोरदार टीका केली जात आहे.

“पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला. पण, नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाझे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.

तर, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी देखील टीका केलेली आहे. “मनपा किंवा राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारीसुद्धा मोदींवर ढकलतील आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा म्हणतील. एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे”. असा टोला त्यांनी लगावला आहे.

“मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नाही. मात्र, चार तासात निचरा झाला नाही तर मात्र आरोप योग्य आहे.”, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांच्या टीकेनंतर आज माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा