InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; आमदाराची स्वपक्षातील खासदारावरच टिका

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीआधी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण जत विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार विलासराव जगताप यांनी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

Loading...

‘भगवी वस्त्र घालणाऱ्या स्वामींनी त्यांचं काम करावं. अशा व्यक्तींचं राजकीय क्षेत्रात काय काम?’ असा सवाल करत आमदार विलासराव जगताप यांनी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या राजकारणातील प्रवेशावर टीकास्त्र सोडलं आहे. आमदार जगताप यांनी जाहीर कार्यक्रमात स्वपक्षातील खासदारावर टीका केल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळालं आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची आज मुंबईतील वसंतस्मृती इथं महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.