International Men’s Day | जागतिक पुरुष दिनाची सुरुवात केव्हा आणि कुठे झाली?, जाणून घ्या
टीम महाराष्ट्र देशा: 8 मार्चला जसा महिला दिन (Women’s Day) सर्वत्र साजरा केला जातो त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men’s Day) साजरा केला जातो. समाज आणि कुटुंबामध्ये पुरुषाचे महत्त्व आणि योगदान साजरे करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्याने समाजात पुरुषांनी अनेक गोष्टी केल्याच पाहिजे असे आपण गृहीत धरतो. मात्र, वयाच्या विविध टप्प्यावर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभावर आधारित आहे. हे सहा आधारस्तंभ पुरुषांची सकारात्मक प्रतिमा दर्शवतात. समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरण यामध्ये पुरुषांचे योगदान किती महत्त्वाचे आहे. हे अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Men’s Day) कसा सुरू झाला?
1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्टइंडीज विद्यापीठांमधील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तिलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला होता. या दिवशी त्यांनी समाजामध्ये पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.
भारतामध्ये जागतिक पुरुष दिन हा पहिल्यांदा 2007 मध्ये साजरा करण्यात आला होता. पुरुषांच्या अधिकारांसाठी झटणारे संस्था ‘Save Indian Family’ यांनी पहिल्यांदा भारतात जागतिक पुरुष दिन साजरा केला होता. त्यानंतर ‘ऑल इंडिया मेन्स वेल्फेअर असोशियन’ ने भारत सरकारकडे महिला दिनाप्रमाणे पुरुष दिन देखील साजरा करावा यासाठी मंत्रालयात मागणी सुरू केली होती.
अनेकदा स्त्रिया बोलून रडून मनातल्या भावना व्यक्त करतात. तर, दुसरीकडे पुरुषांमध्ये रडणं म्हणजे कमजोरीचा लक्षण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुरुषांवर नेहमी अनेक गोष्टींमुळे समाजाचा मानसिक दबाव असतो. यामधून त्यांच्या आरोग्यावर नकळत परिणाम होऊन त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पुरुषांना मानसिक रित्या देखील समाजात व्यक्त होता यावे यासाठी जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या
- Neelam Gorhe | “हे तर चिंटूचे…”, नारायण राणेंच्या टीकेला नीलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व…”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरुन ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं
- IPL 2023 | MI मध्ये परतणार ‘हा’ खूंखार बॉलर
- Sanjay Raut | “स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी…”; संजय राऊतांचा रणजीत सावरकरांवर निशाणा
- Narayan Rane | नीलम गोऱ्हे यांच्याबाबत नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.