InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

7 अब्ज 3 कोटी 48 लाखांची मालक असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत मांजरीचे निधन

- Advertisement -

तब्बल 7 अब्ज, 3 कोटी, 48 लाख रुपयांची मालक असलेल्या जगातील सर्वात श्रींमत ग्रुम्पी कॅट नावाच्या मांजरीचे काल निधन झालेले आहे. ग्रुम्पी कॅट तिच्या रागट लुकसाठी इंटरनेटवर प्रसिद्ध होती. वयाच्या 7 व्या वर्षी तिचे निधन झाले आहे. तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

Grumpy Cat चे खरे नाव Tardar Sauce असे होते. मृत्राचा संसर्ग झाल्याने ग्रुम्पीचा मृत्यू झाला. मॉरिसटाऊनचे प्रसिद्ध उद्योजक तबाथा यांची ही कॅट आहे. ग्रुम्पीचा 2012 साली एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तिच्या चेहऱ्यावरील रागट हावभाव दाखवण्यात आले होते. या व्हिडीओ 15.7 मिलियन लोकांनी बघितला होता. त्यानंतर ती एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीप्रमाणे प्रसिद्ध झाली होती. तिचे ट्विटरवर 1.53 मिलियन फॉलोवर्स आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.