InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

जम्मूमधील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद

- Advertisement -

जम्मूमध्ये काश्मीरमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जम्मूमधील पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. तब्बल १२ दिवसांनी काल, शनिवारी दि.१७ काश्मीरमध्ये लँडलाईनसह २ जी इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली. मात्र, एक दिवस होतो न होतो तोच आज  पुन्हा एकदा जम्मू-काश्मीर राज्याच्या जम्मू, सांबा, कठुआ, रियासी आणि उधमपूर भागातील २ जी इंटरनेट सेवा खंडीत केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या व बनावट बातम्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काल, शनिवारी काश्मीरच्या काही भागांमधील निर्बंध शिथील करून २ जी व लँडलाईन सेवा सुरू केली होती.

- Advertisement -

कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते. तसेच या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संथगतीने सुरू करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.