InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

निवडणूक काळात काश्मीर पेक्षा जास्त हिंसा पश्चिम बंगालमध्ये – मोदी

पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी म्हणाले, पश्चिम बंगालच्या तुलनेत जम्मू-काश्मीरमधल्या निवडणुका जास्त शांततापूर्ण झाल्या. हिंसा आणि दहशतवाद म्हटल्यास पहिलं नाव काश्मीरचं येतं. परंतु काश्मीरमधल्या पंचायत निवडणुकीतही एवढी हिंसा झालेली नाही. तर दुसरीकडे बंगालच्या पंचायत निवडणुकीत शेकडो लोक मारले गेले आहेत. मोदी न्यूज 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

हिंसा आणि दहशतवादाचा विषय आल्यास काश्मीरचं नाव येतं. परंतु त्याच काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान 30 हजार लोक बाहेर पडले होते. त्यावेळीसुद्धा एवढी हिंसा झाली नाही. जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवतात आणि तटस्थ राहतात, त्यांचं मौनही फारच चिंताजनक आहे. कारण काहींचा पूर्ण कार्यकाळ मोदींच्या विरोधात द्वेष पसरवण्यात गेला. त्यामुळेच देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अशी टीका मोदींनी ममता बनर्जी यांच्यावर केली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply