IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर; ६.५ कोटी मोजलेला ‘प्रमुख’ खेळाडू ७ एप्रिलला होणार फिट!

मुंबई : आयपीएल २०२२ पूर्वी अनेक संघांचे प्रमुख खेळाडू दुखापतीच्या समस्येने त्रस्त आहेत आणि त्यापैकी एक संघ दिल्ली कॅपिटल्स हा आहे. दिल्लीचा आघाडीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया आयपीएलमध्ये केव्हा खेळणार याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. मात्र, आता नॉर्कियाच्या उपलब्धतेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तंदुरुस्त होईल.

क्रिकबझशी बोलताना दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने सांगितले, की नॉर्किया संघाच्या तिसऱ्या सामन्यात भाग घेणार आहे. म्हणजेच ७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळताना दिसणार आहे. नॉर्किया नुकताच मुंबईत पोहोचला असून संघात येण्यापूर्वी तो क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहे.

दिल्लीचा संघ नॉर्कियावर जास्त अवलंबून आहे आणि त्यामुळेच त्यांनी कागिसो रबाडाला रिटेन न करता ६.५ कोटींची रक्कम देऊन नॉर्कियाला कायम ठेवले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने नॉर्कियाच्या दुखापतीबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही पण गेल्या काही महिन्यांपासून तो एकही सामना खेळलेला नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा