IPL 2022: आरसीबीच्या संघात ‘हा’ अंडर १९ स्टार करतोय नेट बॉलिंग; वर्ल्डकपमध्ये केली होती अप्रतिम कामगिरी

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आयपीएलसाठी नेट बॉलर म्हणून अफगाणिस्तानचा अनकॅप्ड फिरकीपटू इझारुलहक नावेद याला करारबद्ध केले आहे. लेग-स्पिनरने असलेल्या नावेदने त्याच्या सोशल मीडियावर RCB जर्सीसह एक सेल्फी पोस्ट करून ही बातमी जाहीर केली. इझहारुलहक हा अंडर १९ अफगाणिस्तान संघाचा एक भाग होता ज्याने २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता.

१८ वर्षीय इझारुलहक नावेद विश्वचषकात आपल्या दमदार कामगिरीने प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने ६ सामन्यात ३. ६३ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने ४ बळी घेतले. युवा फिरकीपटूला आता आरसीबी कॅम्पमध्ये आपले कौशल्य सुधारण्याची संधी मिळाली आहे. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंना गोलंदाजी करणे या नावेदला त्याच्या भविष्यासाठी नक्कीच मदत करेल.

मिळालेल्या संधीचा फायदा घेत इझहारुलहकने त्याच्या कामगिरीवर योग्य नजर ठेवली, तर भविष्यात त्याला आयपीएल करार नक्कीच मिळू शकतो. अफगाणिस्तानची प्रतिष्ठा पाहता त्यांनी नेहमीच जागतिक दर्जाचे फिरकीपटू तयार केले आहेत. रशीद खान आणि मुजीब उर रहमान या खेळाडूंनी टी २० फॉरमॅटमध्ये आणि आयपीएलमध्ये आधीच ठसा उमटवला आहे, इझहारुलहक वरिष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवत असेल तर तो निश्चितपणे स्वतःचे नावही दिग्गजांच्या यादीत नोंदवू शकतो.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा