IPL 2023 | आणखी एका चुकीमुळे विराट कोहलीवर घातली जाऊ शकते बंदी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आरसीबी (RCB) चा कार्यवाहक कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने संघाला सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमध्ये त्याने तब्बल 18 महिन्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध संघाचे नेतृत्व केले. मात्र, यादरम्यान विराट कोहलीसाठी एक वाईट बातमी आली आहे.

रविवारी (23 एप्रिल) आरसीबी आणि राजस्थान रॉयल विरुद्धच्या सामन्यामध्ये षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल विराट कोहलीला दंड आकारण्यात आला आहे. स्लो ओवर रेटमुळे संघाला आयपीएलमध्ये (IPL 2023) दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला आहे. यावेळी कर्णधारासह संपूर्ण संघाला दंड लावला गेला आहे. विराट कोहलीला तब्बल 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर संघातील इतर खेळाडूंनाही शिक्षा मिळाली आहे.

स्लो ओव्हर रेटमुळे आरसीबीच्या इतर खेळाडूंच्या मॅच फीमध्ये 25 टक्के कपात करण्यात आली आहे. याआधी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीला याला दंड भरावा लागला होता. संघाला दुसऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. आरसीबी संघाने पुढील कोणत्याही सामन्यात (IPL 2023) हा नियम मोडला तर संघाच्या कर्णधाराला 30 लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

दरम्यान, संघाने पुन्हा अशी चूक केली तर कर्णधाराला एक किंवा अधिक सामन्यांसाठी (IPL 2023) बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये विराट कोहलीने कर्णधार पद भूषवल्यास त्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा त्याला मोठी शिक्षा भोगावी लागू शकते.

महत्वाच्या बातम्या