IPL 2023 | आधीच टीम इंडियातून बाहेर असताना ‘या’ खेळाडूचे आयपीएल करिअर धोक्यात

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल सुरू असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूच्या करिअरवर टांगती तलवार आहे. आयपीएल 2023 सीजन सोबतच या खेळाडूचे क्रिकेट करिअर संपणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हा खेळाडू आयपीएलमध्ये सतत फ्लॉप ठरतं आहे. खराब खेळीमुळे त्याला आधीच टीम इंडियातून बाहेर काढण्यात आले आहे. आता त्याचे आयपीएल करिअरही संकटात सापडले आहे. या खेळाडूला सातत्याने संधी मिळत आहे. मात्र, हा खेळाडू संधीचे सोनं करण्यात यशस्वी ठरू शकला नाही.

‘या’ खेळाडूचे आयपीएल करियर धोक्यात (‘This’ player’s IPL career is in jeopardy)

आयपीएलमध्ये (IPL 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) कडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सातत्याने फ्लॉप ठरत आहे. मागच्या सीझनमध्ये दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याच्या बॅटमधून धावांचा वर्षाव होत होता. मात्र, या हंगामात तो आपलं स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. दरम्यान त्याच्या आयपीएल  करिअरवर टांगती तलवार आहे.

दिनेश कार्तिकने आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहे. त्यामध्ये त्याने 11.86 च्या सरासरीने केवळ 83 धावा केल्या आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यांमध्ये दिनेश कार्तिक टीममधून आपले स्थान गमावावे लागू शकते.

या हंगामामध्ये (IPL 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिनेश कार्तिकला तब्बल 5.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आयपीएल 2023 च्या या हंगामात तो फ्लॉप ठरत असल्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. आतापर्यंत तो एकही मोठी इनिंग खेळू शकला नाही. संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तो त्या पूर्ण करू शकला नाही. दिनेश कार्तिकसाठी जवळपास टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने टीम इंडियासाठी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो भारतीय संघापासून दूर आहे.

महत्वाच्या बातम्या