IPL 2023 | आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने बदलला कॅप्टन; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आमने-सामने येणार आहे. अशात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार नसल्याची माहिती मिळाली आहे. केएल राहुल ऐवजी दुसरा खेळाडू चेन्नईविरुद्ध संघाचे नेतृत्व करणार आहे. कारण केएल राहुलला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आता लीगमध्ये पुढे खेळणार की नाही, याचा निर्णय बीसीसीआय (BCCI) लवकरच देणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यामध्ये (IPL 2023) बाउंड्री लाईनवर चेंडूचा पाठलाग करत असताना केएल राहुलला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची ही दुखापत गंभीर असून तो आजच्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यामध्ये खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व (‘This’ player will lead the team)

आयपीएल (IPL 2023) मध्ये केएल राहुलच्या अनुपस्थितीमध्ये कृणाल पंड्या (Krunal Pandya) संघाचे नेतृत्व करणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये राहुलने बॅटिंग केली होती. मात्र, फिल्डिंग करताना जखमी झाल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. त्यानंतर संघाचे नेतृत्व कृणाल पंड्याने सांभाळले होते.

पुढच्या महिन्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झालेला असून, केएल राहुल देखील टीमचा भाग आहे. अशात केएल राहुलच्या दुखापतीमुळे BCCI आणि LSG दोन्हीच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या