IPL 2023 | आयपीएलमध्ये अजून एकही विकेट घेतली नाही, तरीही ‘या’ खेळाडूला मिळाले टीम इंडियात स्थान

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship 2023) च्या फायनलसाठी सुसज्ज होत आहे. नुसतीच WTC साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आयपीएलमध्ये एकही विकेट न घेतलेल्या खेळाडूला स्थान मिळालं आहे. या आयपीएल हंगामामध्ये या खेळाडूने आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहे. मात्र, तो एकाही सामन्यामध्ये यश मिळू शकलेला नाही. अशात बीसीसीआयच्या सिलेक्टर्सने त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीम इंडियामध्ये स्थान दिलं आहे.

‘या’ खेळाडूला मिळाले टीम इंडियात स्थान (‘This’ player got a place in Team India)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकर (Jaydev Unadkar) ला टीम इंडिया स्थान मिळालं आहे. जयदेव आयपीएलमध्ये एक-एक विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. अशात त्याला टीम इंडियात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्या आयपीएल (IPL 2023) प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे.

जयदेव उनाडकरला डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या बांगलादेश दौऱ्यात भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले होते. तब्बल बारा वर्षानंतर त्याचे टीम इंडियात पुनरागमन झाले होते. यामध्ये त्याने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या डावात 50 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, जयदेव उनाडकरने आत्तापर्यंत आयपीएलचे 94 सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 91 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये हॅट्रिक घेण्याचा विक्रम देखील केला आहे. तर आयपीएलमध्ये पाच विकेट घेण्याचा कारनामा त्याने दोनदा केला आहे. मात्र यावर्षी, तो आयपीएलमध्ये संघर्ष करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.