IPL 2023 | आयपीएलवर कोरोनाचे संकट! ‘हा’ दिग्गज कोरोना पॉझिटिव्ह
IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 31 मार्च 2023 पासून सुरु झाली आहे. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titanson GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings CSK) यांच्यामध्ये पहिला सामना पार पडला. आयपीएल सामने सुरू होतात आयपीएलवर कोरोनाचे (Corona) सावट पसरले आहे. आयपीएलमधील एका दिग्गजाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
आयपीएल 2023 मध्ये ‘हा’ दिग्गज कोरोना पॉझिटिव्ह (‘This’ legend is Corona positive in IPL 2023)
दिग्गज कॉमेंटेटर आकाश चोप्रा (Akash Chopra) यांना कोरोनाची लागण (Corona positive) झाल्याची माहिती मिळाली आहे. आकाश चोप्रा यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्विट करत ते म्हणाले आहे, “माझ्यावर पुन्हा एकदा कोरोनाने हल्ला केला आहे. मला कोरोनाची लक्षणे जाणवली आहेत. त्यामुळे मी काही दिवस कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार नाही. माझा घसा खराब झाल्यामुळे मी कॉमेंट्री करू शकत नाही.”
Caught and Bowled Covid. Yups…the C Virus has struck again. Really mild symptoms…all under control. 🤞
Will be away from the commentary duties for a few days…hoping to come back stronger 💪 #TataIPL— Aakash Chopra (@cricketaakash) April 4, 2023
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आकाश चोप्रा आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही. आकाश चोप्रा आयपीएलमध्ये हिंदीत जिओ सिनेमासाठी कॉमेंट्री करतात. आकाश चोप्रा हे हिंदी कॉमेंट्री क्षेत्रातील खूप लोकप्रिय नाव आहे. त्यांच्या कॉमेंट्रीमुळे त्यांची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे.
केन विलियम्सन आयपीएल 2023 मधून बाहेर (Kane Williamson out of IPL 2023)
दरम्यान, गुजरात टायटन्सनचा खेळाडू आणि न्युझीलँड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये विलियम्सनच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरायला त्याला बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Green Tea | नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ फायदे
- SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Rosemary Water | रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांना मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- AAI Recruitment | एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.