IPL 2023 | आयपीएल चॅम्पियन्सवर पैशाचा पाऊस! कुणाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. हा अंतिम सामना जो संघ जिंकेल त्याच्यावर पैशाचा वर्षाव होणार आहे. त्याचबरोबर जो संघ पराभूत होईल त्याला देखील करोडो रुपये मिळणार आहे.

उद्या (28 मे) चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांमध्ये आयपीएल (IPL 2023) चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये विजेता ठरणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहे. तर फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या स्थानी राहिलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) ला देखील मोठी रक्कम येणार आहे.

How much money IPL 2023 champions will get

विजेता: 20 कोटी
उप विजेता: 13 कोटी
तिसऱ्या स्थानावरील संघ (MI): 7 कोटी
चौथ्या स्थानावरील संघ (LSG): 6.5 कोटी
पर्पल कॅप: 15 लाख रुपये
ऑरेंज कॅप: 15 लाख रुपये
एमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: 20 लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन: 15 लाख रुपये
गेम चेंजर ऑफ द सीजन: 12 लाख रुपये
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ऑफ द सीजन: 12 लाख रुपये

दरम्यान, आयपीएल (IPL 2023) मध्ये एकूण 74 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 70 लीग मॅच स्टेज आणि चार प्लेऑफ सामने होते. लीग सामने खेळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले होते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45xg6ao