IPL 2023 | कॅप्टन नंतर फिल्डिंग कोच पण बदलणार का पंजाब किंग्ज?

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन चे नियोजन सुरू केले आहे. तर, यावर्षी आयपीएल मध्ये पंजाब किंग्स (Panjab Kings) या संघामध्ये मोठ्या बदल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी आयपीएल संघ पंजाब किंग्सने मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) च्या जागी शिखर धवन (Shikhar Dhawan) ला संघाचा कर्णधार घोषित केले आहे. दरम्यान, आता कर्णधार पाठोपाठ या संघाने आपला फिल्डिंग कोच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल कुंबळेने पंजाब किंग्स संघ सोडल्याची माहिती या फ्रॅंचाईजीने आधी दिली होती. अनिल कुंबळे यांच्या जागी ट्रेवर बेलिस यांना पंजाब किंग्स चे कोच बनवण्यात आले आहे. तर, अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू पंजाब किंग्सचे फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स यांना देखील ही फ्रॅंचाईजी बदलू शकते.

क्रिकबझच्या एका अहवालानुसार, पंजाब किंग्सचे फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट किपर ब्रॅड हॅडिनचा संघात प्रवेश होऊ शकतो. ते या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहू शकता. ब्रॅड हॅडिनने आधी सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये काम केले आहे.

IPL 2020 पासून अनिल कुबडे पंजाब किंग्स या संघासोबत होते. मात्र ते या संघाला एकही विजेतेपद मिळवून देऊ शकले नाही. दरम्यान, IPL 2020 आणि 2021 मध्ये के एल राहुल याने कर्णधार पद भूषवले होते. त्यानंतर IPL 2022 मध्ये संघाने मयंक अग्रवालला कर्णधार बनवले होते. पण मयंकच्या नेतृत्वाखाली देखील संघाला टॉप 4 मध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे IPL 2023 मध्ये पंजाब किंग्स ने शिखर धवनला कर्णधार बनवले आहे. या फ्रेंचाईजीने त्याला 8.25 या रकमेसह टीमचे कॅप्टन बनवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.