IPL 2023 | ख्रिस गेलने लाईव्ह कार्यक्रमात केला अनिल कुंबळेवर गंभीर आरोप, म्हणाला…

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) चा मिनी लिलाव कोची येथे नुकताच पार पडला आहे. या लिलावामध्ये सर्व संघांनी आपल्याला महत्त्वपूर्ण असलेल्या खेळाडूंवर बोली लावली होती. या लिलावादरम्यान प्रसारण वाहिनीसाठी काही माजी क्रिकेटपटू एक्सपर्ट म्हणून जोडले गेलेले होते. यावेळी जिओ सिनेमावरील एका कार्यक्रमात वेस्टइंडीजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलने भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेवर गंभीर आरोप लावले आहे.

ख्रिस गेल आयपीएल 2021 च्या हंगामापर्यंत पंजाब किंग्सचा भाग होता. आता त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. ख्रिस गेल हा डावखुरा फलंदाज सर्वसाधारणपणे अतिशय हसता- खेळता व्यक्तिमत्व असणारा खेळाडू मानला जातो. दरम्यान, त्याने आपल्या खास शैलीमध्ये जिओ सिनेमाच्या लाईव्ह शोमध्ये पंजाब संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर आरोप केला आहे. यामध्ये त्याने अनिल कुंबळे यांना टोमणे देखील मारला आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या ख्रिस गेलच्या या व्हिडिओमध्ये त्याने अनिल कुंबळेला टोमणा मारत, त्यांच्या चुकीची आठवण करून दिली आहे. या लाईव्ह शोमध्ये गेल अनिल कुंबळेडे बघून म्हणाला की,”मी कदाचित नशीबवान आहे. मी अनेक प्रसंगांमध्ये भाग्यवान आहे. अनिल संघाचा भाग होता म्हणून त्याने मला संघातून वगळले. त्यामुळे तो आता इथे माझ्यासोबत बसला आहे. संघाने अनिललाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजले असेलच अशी मी अशा व्यक्त करतो.” असे म्हणत ख्रिस गेलने अनिल कुंबळेवर टोमणा मारला आहे.

दरम्यान, या लाईव्ह शोमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन आणि स्कॉट स्टायरिस सुद्धा उपस्थित होते. आयपीएल लिलावावेळी थेट प्रक्षेपण करत असताना यांना देखील गेलचा विनोद समजला. आयपीएल लिलावाच्या थेट प्रक्षेपणाच्या वेळी ऑनलाईन फॉर्मेटमध्ये कुंबळे आणि गेल एक्सपर्ट म्हणून सहभागी झाले होते. दरम्यान, गेल आपल्या नेहमीच्या मजेदार स्वभावामध्ये दिसला.

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा मिनी लिलावामध्ये सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पुरन या खेळाडूंवर देखील पैशाचा चांगलाच पाऊस पडला आहे. या आयपीएल लिलावामध्ये 29 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.