IPL 2023 | रवींद्र जडेजासाठी CSK मॅनेजमेंट टीम सोबत भिडला MS धोनी

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईझिंनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासातील दुसरी यशस्वी टीम आहे. यावर्षी आयपीएल सीझन मध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि CSK चे संबंध खराब झाल्याच्या बातम्या गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने येत आहे.

दरम्यान, रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग ही टीम सोडत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण चेन्नई सुपर किंग्स कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) याला रवींद्र जडेजा आपल्या टीम मध्ये हवा आहे. त्यामुळे कॅप्टन महेंद्रसिंग धोनी थेट CSK च्या फ्रॅंचाईझि सोबत भिडला आहे. यावर्षी आयपीएल मध्ये रवींद्र जडेजा याला चेन्नई सुपर किंग च्या कॅप्टन पदावरून हटवण्यात आलं आहे. रवींद्र जडेजाला कॅप्टन पदावरून हटवून धोनीची पुन्हा एकदा कॅप्टन पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या घडामोडी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयपीएल सीझन सुरू असतानाच रवींद्र जडेजाला दुःखपतीमुळे माघार घ्यावी लागली होती. दरम्यान, CSK 2023 वर्षातील आयपीएल सीजनची तयारी करत आहे. बीसीसीआयने दिलेल्या तारखेनुसार, 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व संघांना आपले खेळाडू रिटेन करायचे आहे. अशा परिस्थितीत CSK रवींद्र जाडेजाला ट्रान्सफर करणार नाही, असे वृत्त समोर येत आहे. कारण टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने जडेजाला टीम मध्ये ठेवण्यासाठी आग्रह धरला आहे.

माजी भारतीय कर्णधार एम एस धोनी याला जडेजाच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी यांनी CSK च्या मॅनेजमेंटला स्पष्ट सांगितले आहे की तुम्ही जडेजाला टीम मधून काढू शकत नाही. तो टीमसाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर कुठलाही खेळाडू जडेजाची जागा भरू शकणार नाही असेही धोनीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.