IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलमध्ये जुने विक्रम मोडले जातात आणि नवे विक्रम रचले जातात. अशा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नावावर आणखी एक नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये धोनीने राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेलला बाद केलं होतं. धोनीने डायरेक्ट हिट करत जुरेलला बाद केलं. त्यानंतर धोनीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली.
धोनीने रचला ‘हा’ विक्रम (Dhoni created this record)
आयपीएल (IPL 2023) मध्ये धोनीने सर्वाधिक गडी धावबाद करण्याचा विक्रम केला आहे. धोनीने आतापर्यंत 23 खेळाडूंना रन आउट केलं आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे नाव आहे. विराट कोहली (Virat Kohli) ने आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 खेळाडू धावबाद केले आहे.
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL 2023) च्या इतिहासात धोनीने आतापर्यंत सर्वात जास्त खेळाडूंना रन आउट केलं आहे. यष्टीरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणताही खेळाडू धोनीचा हात पकडू शकत नाही. वयाच्या 41 व्या वर्षी धोनीची खेळी आणि चालाखी तरुणाईला लाजवेल अशी आहे. यष्टीरक्षण कौशल्याच्या जोरावर धोनीने आजपर्यंत अनेक सामने जिंकले आहेत.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये धोनीने डायरेक्ट हिट मारत जुरेलला आऊट केल्यानंतर प्रेक्षकांनी धोनीच्या नावाची घोषणाबाजी सुरू केली होती. या सामन्यामध्ये नेहमीप्रमाणेच धोनीची शानदार विकेटकीपिंग पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे काल जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम धोनीच्या फॅन्सने खचाखच भरलेले दिसले.
महत्वाच्या बातम्या
- CRPF Recruitment | पदवीधरांना उत्तम संधी! केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘या’ पदासाठी भरती जाहीर
- Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला तर काय करायचं? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
- Ambadas Danve Vs Abdul Sattar ‘अब्दुल सत्तार कुंकू लावतात एकाचं, लग्न एकासह अन् राहतात एकाबरोबर’ – अंबादास दानवे
- Job Opportunity | ‘या’ संस्थेमार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू
- Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी दह्याच्या ‘या’ पद्धतीने करा वापर