IPL 2023 | सनराइजर्स हैदराबादने मयंक अग्रवाल ऐवजी ‘या’ दिग्गज खेळाडूला दिले कर्णधार पद

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत सनरायझर्स हैदराबाद (Sunrises Hyderabad SRH) ने आयपीएल 2023 साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.

सनराइजर्स हैदराबादने ‘या’ दिग्गज खेळाडूला दिले कर्णधार पद (Sunrisers Hyderabad gave ‘this’ player the captaincy)

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एडन मार्कराम (Aidan Markram) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सांभाळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद ट्विट करत आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावापूर्वी सनराइजर्स हैदराबादने नियमित कर्णधार केन विल्यम्सनला सोडले होते. त्यानंतर मयंक अग्रवाल संघाचे कर्णधार पद सांभाळेल अशी चर्चा सुरू होती. मात्र आता या संघाचे नेतृत्व एडन मार्कराम हा दिग्गज खेळाडू करणार आहे.

गेल्या आयपीएल (IPL) हंगामामध्ये एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्याने आयपीएल 2022 मध्ये 40.54 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने एकूण 381 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. तो आता कर्णधार पद कसे सांभाळणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयलमधील मुख्य वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasiddha Krishna) संघातून कायमचा बाहेर झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो गेले अनेक दिवस क्रिकेटपासून दूर आहे. स्ट्रेस फॅक्चर झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्याला पुनर्वसनासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या या हंगामात खेळू शकणार नसल्याचे फ्रॅंचाईजीने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.