IPL 2023 | सनरायझर्स हैदराबाद कर्णधार पदासाठी ‘या’ खेळाडूवर लावू शकते बोली
IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) चा मिनी लिलाव (Mini Auction) दोन दिवसांवर आला आहे. कोची येथे 23 डिसेंबर २०२२ रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. या लीलावामध्ये एकूण 403 खेळाडू सहभागी होणार आहेत. आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी अनेक संघांमध्ये बरेच बदल बघायला मिळाले आहेत. यामध्ये अनेक संघांनी आपल्या खेळाडूंना सोडले आहे, तर अनेक संघानी आपल्या टीममध्ये नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. या यादीमध्ये केन विल्यम्सनचा ही समावेश होता. सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार केन विल्यम्सन याने संघ सोडला आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने हैदराबादला कर्णधार म्हणून मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) कडे लक्ष द्या, असे सांगितले आहे. इरफान पठाण स्टार स्पोर्ट्स शो गेम प्लॅनमध्ये म्हणाला की,”सनरायझर्स हैदराबादला मयंक अग्रवालसोबत जायला आवडेल. मयंक अग्रवाल हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. विलियम्सनंतर संघाला एका आक्रमक फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही मयंकला संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करू शकतात.”
मयंक अग्रवाल गेल्या आयपीएल हंगामामध्ये पंजाब किंग्ज या संघाचा कर्णधार होता. पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून त्याला काही विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याच्या नेतृत्वाखाली संघ प्ले ऑफ पर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता. त्याचबरोबर आयपीएल 2022 मध्ये मयंकची बॅट पूर्णपणे शांत होती. अशा परिस्थितीत पंजाबने त्याला सोडले होते.
सनरायझर्स हैदराबाद केन विल्यम्सनला सोडले होते. गेल्या आयपीएल हंगामामध्ये संघाने त्याला पुन्हा 14 कोटी मध्ये रिटेन केले होते. हैदराबाद देखील गेल्या हंगामात प्ले ऑफ मध्ये पोहचू शकला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये हैदराबाद मयंत अग्रवालला आपला कर्णधार निवडू शकते.
आयपीएल 2023 मध्ये हैदराबादने केन विलियम्सन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद या खेळाडूंना रिलीज केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील ब्लाइंड पिंपल्सपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Jayant Patil | फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादीचा झेंडा! जयंत पाटील म्हणाले, “दलबदलूचे राजकारण…”
- Sanjay Raut | “दिल्लीला गेले तेव्हा गृहमंत्र्यांनी गुंगीचे इंजेक्शन टोचले का?”; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीका
- Amruta Fadanvis | “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नवे राष्ट्रपिता…”; अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
- Congress | “शिंदे-बोम्मईंना एकाच खोलीत बंद करा, कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा अजब सल्ला
Comments are closed.