IPL 2023 | राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज गोलंदाज संघातून कायमचा बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी पहिली चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) ला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य वेगवान गोलंदाज संघातून कायमचा बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला आयपीएलपासून दूर राहावे लागणार आहे.

राजस्थान रॉयल्समधील मुख्य वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा (Prasiddha Krishna) संघातून कायमचा बाहेर झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो गेले अनेक दिवस क्रिकेटपासून दूर आहे. स्ट्रेस फॅक्चर झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्याला पुनर्वसनासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या या हंगामात खेळू शकणार नसल्याचे फ्रॅंचाईजीने सांगितले आहे.

फ्रॅंचाईजीने दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध कृष्णाच्या बदलीची मागणी केली आहे. लवकरच त्याच्या बदलीची घोषणा केली जाणार आहे. राजस्थान रॉयल्सकडे कुलदीप सिंह, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, आणि जेसन होल्डर इत्यादी वेगवान गोलंदाज आहे.

राजस्थान रॉयल्सने आयपीएल (IPL 2023) लिलावामध्ये 10 कोटी रुपयात प्रसिद्ध कृष्णाला विकत घेतले होते. गेल्या आयपीएल हंगामामध्ये हा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, अंतिम फेरीत जेतेपद गुजरात टायटन्सने आपल्या नावावर केले होते. राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा पहिला हंगाम जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या