IPL 2023 | 1 डॉट बॉल 500 झाडं! Tata चा आयपीएलच्या माध्यमातून मोठा उपक्रम

IPL 2023 | कालपासून (23 मे) आयपीएल 2023 च्या प्लेऑफ राउंडला सुरुवात झाली आहे. तर कालच्या सामन्यादरम्यान स्क्रिनवर एक वेगळंच चित्र पाहायला मिळत होत. ते म्हणजे डॉट बॉलच्या ठिकाणी झाडांचं चित्र दिसत होत. यामुळे सर्वांनाच नक्की हे झाडाचं चित्र का दिसत आहे? त्यामागचं कारण नक्की काय आहे? याबाबत सर्वांनाच जाणून घेण्याची ओढ लागली आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे सचिव जय शहांनी ( jay Shah ) आज (24 मे) याबाबत ट्विट केलं आहे.

1 डॉट बॉल 500 झाडं-

ट्विट करत जय शहांनी ( Jay Shah) म्हटलं आहे की, आम्हाला टाटा कंपनीच्या भागीदारीचा अभिमान आहे. IPL प्लेऑफमध्ये टाटा कंपनी (TataCompani) प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 रोपे लावत आहेत. तर क्वालिफायर 1 GTvsCSK ला 42,000 रोपे मिळाली. ते म्हणजे 84 डॉट बॉल्समुळे. यामुळे कोण म्हणतं T20 हा फलंदाजी करणाऱ्यांचा खेळ आहे? गोलंदाजांनो, हे सर्व तुमच्या हातात आहे. असं ट्विट जय शहांनी केलं आहे. तर 1 डॉट बॉल 500 झाडं असा हा टाटाचा आयपीएलच्या माध्यमातून मोठा उपक्रम असल्याचं सांगितलं जातं आहे.

Jay Shah Tweet On Ratan Tata

दरम्यान, बीसीसीआयने (BBCI) आयपीएल 2023 ( IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये टाकल्या गेलेल्या प्रत्येक डॉट चेंडूवर 500 झाडं लावण्याचा निर्धार केला परंतु यामध्ये टाटा कंपनीचे देखील तेवढाच हातभार आहे. त्यामुळे टीव्ही स्क्रिनवर प्रत्येक डॉट चेंडूवर झाड दिसत होत. यामुळे बीसीसीआयच्या या कल्पनेचं सर्वत्र कौतुक होत असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/422pVtV

You might also like

Comments are closed.