IPL 2023 Closing Ceremony | ‘हे’ दिग्गज कलाकार असणार IPL च्या क्लोजिंग सेरेमनीचे आकर्षण

IPL 2023 | गुजरात : सध्या IPL 2023 चा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे फायनल ( IPL Final ) 28 मे तारखेला खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज ( CSK)आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर आयपीएलने ( IPL) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीला (IPL 2023 Closing Ceremony) कोणते दिग्गज कलाकार थिरकणार आहेत याची माहिती दिली. यामुळे चाहत्यांना देखील IPL च्या फायनल मॅचची ओढ लागली आहे.

IPL 2023 Closing Ceremony –

आयपीएलने ( IPL) ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध रॅपर किंग आणि डीजे न्युक्लिया हे या सेरेमनीमध्ये पाहायला मिळणार आहेत. तसचं गायक डिवाईन (Divine) आणि जोनिता गांधी (Jotika Gandhi) देखील असणार आहेत. प्रत्येक वर्षी अंतिम सामन्यांच्या आधी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळत. तसचं यावर्षी देखील स्टेडियम मध्ये अनेक कलाकारांसह क्रिकेटप्रेमी पाहायला मिळतील.

CSK Vs GT IPL 2023 Final Match

दरम्यान, IPL 2023 चा हंगामात फारच रंजक झाला असून यामध्ये प्रत्येक संघाने चांगली कामगिरी केली. तर काल (26 मे) गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला परंतु, मुंबई इंडियन्स पराभव करत गुजरात टायटन्स (GT) फायनल मध्ये झेप घेतली. यामुळे आता IPL फायनल चेन्नई सुपर किंग ( CSK) आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3orXsA9