IPL 2023 | CSK मधील ‘या’ महाराष्ट्राच्या खेळाडूला Dhoni का देत नाहीये संधी?

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा 37 वा सामना राजस्थान रॉयल (Rajasthan Royal) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यामध्ये गुरुवारी (27 एप्रिल) पार पडला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये धोनीने (MS Dhoni) एका खेळाडूला संधी दिली नसल्याचे दिसून आले आहे. या खेळाडूला आयपीएलमध्ये फक्त दोन सामन्यांमध्ये संधी मिळालेली आहे. त्यानंतर तो मैदानापासून लांब आहे.

चेन्नई सुपर किंगमधील राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hungergekar) या खेळाडूला सीएसकेने आत्तापर्यंत फक्त दोन वेळा खेळण्याची संधी दिली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सीजनमधील पहिल्या सामन्यात (IPL 2023) राजवर्धनला संधी देण्यात आली होती. अहमदाबादमध्ये खेळले गेलेल्या या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने कमालीचे प्रदर्शन केलं होतं. या सामन्यामध्ये त्याने  3 विकेट घेत 36 धावा दिल्या होत्या. तर या हंगामात दुसरा सामना त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला होता. त्यानंतर धोनीने त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवलं आहे.

राजवर्धन हंगरगेकर टीम इंडियाकडून अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. त्याचबरोबर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 13 विकेट्स घेतल्या आहे. तर टी-20 करिअरच्या सामन्यांमध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, आयपीएलमध्ये (IPL 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सातत्याने फ्लॉप ठरत आहे. मागच्या सीझनमध्ये दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता. मात्र, या हंगामात तो आपलं स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. दरम्यान त्याच्या आईपीएल करिअरवर टांगती तलवार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.