IPL 2023 | CSK ला बेन स्टोक्सच्या रूपात मिळाला नवीन कर्णधार?, CEO विश्वनाथन यांचा खुलासा

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) चा मिनी लिलाव (Mini Auction) पार पडला. या लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली इतर संघाच्या तुलनेमध्ये संतुलित दिसत आहे. कारण सीएसकेने लिलावामध्ये आपल्या संघात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा समावेश केला आहे. यानंतर पुढील हंगामात एम एस धोनी च्या जागी बेन स्टोक्स सीएसकेचे नेतृत्व करू शकतो, अशा बातम्या पसरू लागल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्जने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला 16.25 किती रुपयांमध्ये विकत घेतले आहे. दरम्यान, बेन स्टोक्स भविष्यामध्ये सीएसकेचे कर्णधार पद सांभाळू शकण्याची संभाव्यता वर्तवली जात आहे. कारण तो महेंद्रसिंग धोनीच्या जागी फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे बजावू शकतो. त्याचबरोबर ब्रावोने निवृत्ती घेतल्यानंतर बेन स्टोक्स त्याची जागा देखील भरून काढू शकतो.

कर्णधार, उत्कृष्ट फिनिशर आणि अष्टपैलू खेळाडू या तिघांची कमतरता भरून काढणाऱ्या बेन स्टोक्सला चेन्नईने आपल्या संघात सामील केले आहे. सीएसके त्याला गरजेनुसार सलामीवीर किंवा मधल्या फळीमध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवू शकते. त्याचबरोबर तो सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे क्षेत्ररक्षण देखील करू शकतो. दरम्यान, सुरेश रैनाने देखील बेन स्टोक्स सीएसकेचे नेतृत्व करू शकतो, असे वक्तव्य केले आहे.

यावर सीईओ विश्वनाथन म्हणाले की,”बेन स्टोक्सला संघात सामील करण्यासाठी आम्ही खूप उत्साहीत होतो. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण तो आमच्या संघात आला. हा अष्टपैलू खेळाडू एम एस धोनीला चांगली साथ देईल. त्याचबरोबर तो एम एस धोनीच्या जागी वेळेनुसार कर्णधार पद स्वीकारू शकतो.” सीओ विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे, की एम एस धोनीच्या अंतिम निर्णयानुसार बेन स्टोक्सकडे संघाचे कर्णधार पद सोपवल्या जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.