IPL 2023 GT Vs MI | नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये महामुकाबला

IPL 2023 | अहमदाबाद : आज (26 मे) IPL चा क्वालिफायर 2 मधील सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर हा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात  ठीक 7. 30 वाजता खेळला जाणार आहे. आता पर्यंत दोन्ही संघाने उत्तम कामगिरी करत क्वालिफायर राऊंड पर्यंत धडक मारली आहे. परंतु आज या दोन्ही संघामध्ये महामुकबला पहायला मिळणार आहे.

रोहित शर्मा- हार्दिक पांड्या यांच्यात ‘काटे की टक्कर’

तसचं आज होणारा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ हा सामना जिंकेल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळेल. IPL च्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने अपेक्षीत अशी कामगिरी केली नव्हती.  परंतु, पुन्हा MI ने आपला जलवा दाखवत क्वालिफायर 2 पर्यंतचा टप्पा पार केला आहे. जर आजचा सामना मुंबई इंडियन्स जिंकली तर IPL जिंकण्याची चांगली संधी MI ला मिळेल.

Gujarat Titans Vs Mumbai Indians

दरम्यान, (24 मे) मुंबई इंडियन्सने ( MI) लखनौला सुपर जायंट्स ( LSG) 183 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु,लखनौला तो आकडा गाठता आला नाही. यामुळे मुंबईने 81 धावांनी लखनौचा पराभव करत क्वालिफायर 2 प्रवेश केला. तसचं गुजरात टायटन्सने जर आजचा सामना जिंकला तर एका नव्या विक्रमाची नोंद होईल असं सांगण्यात येत आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोण नाणेफेक जिंकणार? किती धावांच लक्ष असणार? कोण सामना जिंकणार याकडे क्रिकेटप्रेमीच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OHbbgV