IPL 2023 | SRH ला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) धडपड करत आहे. अशा परिस्थितीत हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. गुरुवारी हैदराबादने याबद्दल माहिती दिली आहे.

‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर (‘This’ player out of IPL)

सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आयपीएल (IPL 2023) हंगामातून बाहेर पडला आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुःखापतीला झुंज देत असल्याची माहिती संघाने दिली आहे. हैदराबादने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. पहिल्या सहा सामन्यांमध्ये सुंदर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने कहर केला होता. अशात तो संघातून बाहेर पडल्यानंतर हैदराबादच्या चिंतेत वाढ झाली आहे.

वॉशिंग्टन सुंदरने दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये 28 धावा देत 3 बळी घेतले होते. या सामन्यामध्ये त्याने एकाच षटकात तीन विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याने पंधरा चेंडूमध्ये नाबाद 24 धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यामध्ये तो फॉर्ममध्ये आला होता. मात्र, तो आता आयपीएल (IPL 2023) हंगामातून बाहेर पडला आहे.

सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये संघर्ष करताना दिसत आहे. सात सामन्यांमध्ये हैदराबादला फक्त दोन वेळा विजयाचा दरवाजा ठोठावता आला आहे. गुणतालिकेमध्ये हा संघ चार गुणांसह 9 व्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.