आयपीएल २०२०ची तारीख ठरली, पण संघ चिंतेत…

इंडियन प्रीमीयर लीग(आयपीएल) 2020 च्या मोसमाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 13 व्या मोसमाचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 2019च्या आयपीएलचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने मिळवल्याने ते 2020च्या मोसमाची त्यांच्या घरच्या मैदानावर सुरुवात करतील.

दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने आयएएनएसशी बोलताना सांगितले की, आयपीएलचा हा 13 वा मोसम सुरु होण्याची तारीख 29 मार्च निश्चित करण्यात आली आहे. “मला सांगण्यात आले आहे की आयपीएल 2020चा मोसम मुंबईत 29 मार्चपासून सुरू होईल,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

कसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…

त्यामुळे जर 29 मार्च ही तारिख निश्चित झाली असेल तर याचा अर्थ असा होतो की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघातील काही खेळाडूंना आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागेल.

टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजांनी हॅट्रिक घेत गाजवले २०१९ चे वर्ष !

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) हे संघ या काळात 3 टी20 सामने खेळणार आहेत. तर इंग्लंड (England) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ 2 कसोटी सामने खेळणार आहेत.ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड टी20 मालिका 29 मार्च रोजी संपेल. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस 31 मार्च आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.