IPL Auction | आयपीएल मिनी लिलावामध्ये ‘हे’ खेळाडू ठरू शकतात महाग
IPL Auction | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) चा मिनी लिलाव (Mini Auction) जवळ आला आहे. कोची येथे 23 डिसेंबर २०२२ रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. या लीलावामध्ये एकूण 404 खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये 123 आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. यावर्षी आयपीएल मिनी लिलावामध्ये जोय रूट, केन विलियम्सन, शाकिब अल हसन, मयंक अग्रवाल, सॅम करण, बेन स्टोक्स यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
बेन स्टोक्स आयपीएलमध्ये दोनदा सर्वाधिक महाग विकला गेला आहे. 2017 आणि 2018 आयपीएल लिलावामध्ये बेन स्टोक्सवर सर्वाधिक बोली लागली होती. दोन कोटी मूळ किंमत असलेला बेन स्टोक्स 2018 मध्ये 12.5 कोटीमध्ये, तर 2017 मध्ये 14.5 कोटी रुपयांनी विकला गेला होता. अशा परिस्थितीमध्ये यावर्षीही तो सर्वात महाग खेळाडू ठरवू शकतो. बेन स्टोक्सने आपल्या आयपीएल कारगर्दीमध्ये 43 सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 134.50 च्या स्ट्राईक रेटने 920 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 28 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल मिनी लिलावामध्ये अष्टपैलू खेळाडू सॅम करण देखील महाग ठरू शकतो. कारण टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यामागे त्याची महत्त्वाची भूमिका होती. सॅम करणने 32 आयपीएल सामन्यांमध्ये 32 विकेट घेतल्या आहे. त्याचबरोबर त्याने 149.78 चा स्ट्राईक रेटने 337 धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या मागच्या हंगामामध्ये पंजाब किंग्सने कर्णधार मयंक अग्रवालला 12 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते. कर्णधार मयंक अग्रवालवर यावर्षीही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. मयंक अग्रवालने एकूण 123 आयपीएल सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 134.28 च्या स्ट्राईक रेटने 2385 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Winter Session 2022 | ‘घेतले खोके, भूखंड ओके’ ; हातात श्रीखंडाचे डबे घेऊन विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
- Corona Virus | कोरोनासोबत लढण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- IND vs BAN | दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियात कुलदीप यादवच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
- Kantara | ‘कांतारा’ जाणार ऑस्करला, होंबळे प्रोडक्शनने दिली माहिती
- IND vs BAN | रोहितनंतर केएल राहुल जखमी, कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?
Comments are closed.