IPL Auction 2023 | आयपीएल मिनी लिलावामध्ये ‘या’ 15 वर्षीय खेळाडूवर लागणार बोली
IPL Auction 2023 | टीम महाराष्ट्र देशा: सर्वात लोकप्रिय लीग आयपीएल (IPL) म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा मिनी लिलाव (Mini Auction 2023) लवकरच पार पडणार आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी कोची येथे 405 खेळाडूंमध्ये हा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यंदा आयपीएलमध्ये आयपीएलपेक्षा दोन महिने मोठा असलेल्या खेळाडूवर बोली लागणार आहे.
आयपीएल (IPL) मिनी लिलावामध्ये ‘या’ 15 वर्षीय खेळाडूवर लागणार बोली
यावर्षी आयपीएल लिलावामध्ये पंधरा वर्षीय अल्लाह मोहम्मद गजनफरवर बोली लागणार आहे.अल्लाह मोहम्मद गजनफरवर याचा जन्म 15 जुलै 2017 रोजी झाला. तर आयपीएल 13 सप्टेंबर 2007 रोजी लाँच झाली होती. म्हणजेच हा खेळाडू आयपीएलपेक्षा फक्त दोन महिने मोठा आहे. यावर्षी आयपीएल लिलावामध्ये सर्वांचे लक्ष या खेळाडूवर असणार आहे. कारण अल्लाह मोहम्मद गजनफर या आयपीएल हंगामामध्ये सर्वात तरुण खेळाडू असेल.
अल्लाह मोहम्मद गजनफर हा एक ऑफ-स्पिनर गोलंदाज असून तो रविचंद्र अश्विनला आपला आदर्श मानतो. आयपीएल लिलावामध्ये कोणताही संघ या खेळाडूला दोन लाख बेस प्राईसमध्ये आपल्या संघात सामील करेल. राशिद खान आणि मोहम्मद नबी या खेळाडूंप्रमाणे या अफगाणी खेळाडूला देखील हिंदी आणि इंग्रजी येत नाही. त्यामुळे त्याला या आयपीएल हंगामामध्ये थोडी समस्या निर्माण होऊ शकते.
23 डिसेंबरला होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावामध्ये 87 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्रीन यांची बेस प्राईस दोन कोटी रुपये आहे. तर, इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जॉय रूटची बेस किंमत एक कोटी रुपये आहे. या लिलावामध्ये 119 खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहे. तर, 262 खेळाडूंनी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. या मिनी लिलावामध्ये 87 जागा रिक्त असून यामध्ये 30 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Devoleena Bhattacharya | ‘या’ व्यक्तीसोबत देवोलीनाने बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर केला फोटो शेअर
- Eknath Shinde | अमित शाह, बोम्मईंसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- Sanjay Raut | सरकार बदलेल तेव्हा सर्वांचा हिशोब पूर्ण करू ; संजय राऊत यांचा इशारा
- Health Care | आवळा चूर्ण खाल्ल्याने मिळतात आरोग्याला ‘हे’ जबरदस्त फायदे
- Honda Electric Bike | होंडाची ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
Comments are closed.