IPL Auction 2023 | केन विल्यमस SOLD OUT, ‘या’ संघातून करणार पदार्पण
IPL Auction 2023 | नवी दिल्ली : आयपीएल 2023 साठी लिलाव सुरू झाला आहे.10 संघांचे मालक आणि प्रशिक्षक कर्मचारी कोची येथील हॉटेल ग्रँड हयात येथे उपस्थित आहेत. एकूण 67 जागेसाठी लिलाव होणार आहे. लिलावापूर्वी सर्वाधिक चर्चा इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, सॅम कॅरेन आणि कॅमेरून ग्रीन यांच्याबद्दल आहे. यंदाच्या मोसमात या तिन्ही अष्टपैलू खेळाडूंवर मोठी बोली लागणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, गेल्या मोसमानंतर सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडल्यानंतर किवी अनुभवी खेळाडूला नवा संघ मिळाला आहे. केन विल्यमसनला गुजरातने त्याची मूळ किंमत दोन कोटींमध्ये विकत घेतले आहे.
2018 च्या मोसमात सनरायझर्सकडून खेळताना स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या केन विल्यमसनसाठी मागील हंगाम अजिबात चांगला नव्हता. डेव्हिड वॉर्नरला वगळल्यानंतर सनराईज हैदराबाद ने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले होते. गेल्या मोसमात केन विल्यमसन फ्लॉप ठरला होता. त्याने 13 सामन्यांत 19.64 च्या सरासरीने केवळ 216 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 93.51 होता. संपूर्ण मोसमात विल्यमसनला फक्त एक अर्धशतक झळकावता आले.
केन विल्यमसन 2015 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये आला होता. आयपीएलमध्ये त्याची एंट्री केवळ 60 लाख रुपयांच्या बोलीने झाली होती. तेव्हापासून तो सतत SRH चा भाग होता. 2017 मध्ये ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर, SRH ने त्याला 2018 च्या मेगा लिलावात 3 कोटी रुपयांना विकत घेतले. वॉर्नरच्या बदल्यात त्याने गेल्या मोसमात कर्णधारपदाची धुरा सांभाळली. विल्यमसनने आयपीएलमधील 8 हंगामात 76 सामने खेळले असून, त्याने 126 च्या स्ट्राइक रेटने 2101 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | सीमावादावर कर्नाटकपेक्षा १० पट प्रभावी प्रस्ताव सोमवारी मांडू ; शंभूराज देसाई यांची माहिती
- Winter Session 2022 | विरोधकांनी उभे केले ‘प्रति सभागृह’ ; अजित पवार सरकारवर कडाडले
- NIT Land Scam | भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती – अजित पवार
- Winter Session 2022 | “निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणा…” ; विरोधकांची घोषणाबाजी, कामकाजावर बहिष्कार
- Corona | “राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी…” ; राज्य सरकारची महत्वाची माहिती
Comments are closed.