IPL Auction 2023 | बस ड्रायव्हरचा मुलगा खेळणार IPL , ‘या’ संघामध्ये झाला सामील

IPL Auction 2023 | कोची: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) चा मिनी लिलाव (Mini Auction) पार पडला. या लिलावामध्ये सॅम करन (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तर कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पुरन या खेळाडूंवर देखील पैशाचा चांगलाच पाऊस पडला आहे. या आयपीएल लिलावामध्ये 29 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना करारबद्ध केले आहे. तर, या लिलावामध्ये एका बस चालकाच्या मुलालाही खेळण्याची संधी मिळाली आहे. हा खेळाडू संजू सॅमसंनच्या खांद्याला खांदा लावून खेळणार आहे.

आयपीएल 2023 मिनी लिलावामध्ये अब्दुल बसीथ (Abdul Basith) या बस चालकाच्या मुलाला खेळण्याची संधी मिळाली आहे. अब्दुल बसीथ हा केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये काम करणाऱ्या एका चालकाचा मुलगा आहे. तो आता संजू सॅमसंनच्या खांद्याला खांदा लावून मैदानावर उतरणार आहे. राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसीथला आपल्या संघामध्ये सामील केले आहे. यावर्षी राजस्थान रॉयल्सने विकत घेतलेल्या 9 खेळाडूंपैकी 3 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. दरम्यान, आरआरने अब्दुल बसीथ या नवीन खेळाडूला संधी दिली आहे.

राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसीथ या खेळाडूला वीस लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. अब्दुल बसीथने एर्णाकुलम या लहानशा गावातून आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. आयपीएल लिलावानंतर त्याच्या आईवडिलांनी तो घरी पोहोचताच त्याचे स्वागत केले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये केरळ संघाकडून त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 149.31 होता. दरम्यान, तो राजस्थान रॉयलसाठी एक चांगला खेळाडू ठरू शकतो.

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सॅम करन ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. त्यामुळे या आयपीएल लिलावामध्ये प्रत्येक संघाचे लक्ष त्याच्याकडे होते. सॅम करनची मूळ किंमत दोन कोटी रुपये होती. आयपीएल लिलावामध्ये राजस्थानने सॅम करनसाठी 11 कोटीपर्यंत बोली लावली होती. त्यानंतर यामध्ये सीएसके उडी घेतली. लिलाव रंगात असताना पंजाब किंग्सने लिलावात उडी घेऊन सॅम करनला आपल्या संघामध्ये सामील केले आहे. पंजाबने तब्बल 18.50 कोटीमध्ये सॅम करनला विकत घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.