IPL Auction 2023 | हॅरी ब्रूकवर पडला पैशांचा पाऊस, सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटींना केले खरेदी

IPL Auction 2023 | नवी दिल्ली : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकसाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत झाली. सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली लावली. यानंतर आरसीबीने बोली मागे घेतली. त्यानंतर राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात लढत झाली. नंतर राजस्थानने देखील बोली मागे घेतली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. तो या आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू आहे. ब्रूकने पाकिस्तान सुपर लीगमध्ये 48 चेंडूत शतक झळकावले होते.

आयपीएल 2023 साठी लिलाव सुरू झाला आहे.10 संघांचे मालक आणि प्रशिक्षक कर्मचारी कोची येथील हॉटेल ग्रँड हयात येथे उपस्थित आहेत. एकूण 67 जागेसाठी लिलाव होणार आहे.

लिलावापूर्वी सर्वाधिक चर्चा इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, सॅम कॅरेन आणि कॅमेरून ग्रीन यांच्याबद्दल आहे. यंदाच्या मोसमात या तिन्ही अष्टपैलू खेळाडूंवर मोठी बोली लागणार असल्याचे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.